"पुड्या सोडणार्‍यांनी सरकारला तात्काळ पुरावे द्यावेत!"

30 Jul 2024 13:31:02
 
Sharad Pawar
 
मुंबई : पुड्या सोडणार्‍यांनी सरकारला तात्काळ पुरावे द्यावेत, असा इशारा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिला आहे. शरद पवारांनी एका सभेत महाराष्ट्रात मणिपूरसारख्या दंगली घडण्याची शक्यता वर्तवली होती. यावरून चित्रा वाघ यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.
 
चित्रा वाघ म्हणाल्या की, "महाराष्ट्रात जातीय तणाव आहे, मराठा आणि ओबीसी यांच्यात धुसफूस सुरू आहे, सगळीकडे दंगली भडकतील, महाराष्ट्राचा मणिपूर होणार अशी बिनबुडाची वक्तव्ये करून 'फेक नॅरेटिव्ह' पसरवणारी 'महा बिघाडी'मध्ये एक फळी निर्माण झाली आहे. त्यामुळे असं बोलणाऱ्यांनी सरकारला या केलेल्या वक्तव्यासंदर्भात तात्काळ पुरावे द्यावेत," असे त्या म्हणाल्या.
 
हे वाचलंत का? -  नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा!
 
त्या पुढे म्हणाल्या की, "महाराष्ट्र शांत आहे, गृहमंत्री सक्षम आहेत. पण ते बघवत नसणारे अशा पुड्या सोडत आहेत. त्यांच्याकडून सरकारने ताबडतोब पुरावे मागावेत, अशी शांतताप्रेमींची मागणी आहे," असेही त्या म्हणाल्या आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0