नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने नवाब मलिकांचा वैद्यकीय जामीन कायम ठेवला आहे. तसेच उच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत हा जामीन कायम राहणार असल्याचेही कोर्टाने म्हटले आहे.
नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित एका प्रकरणात नवाब मलिक यांना २०२२ मध्ये अटक करण्यात आली होती. सध्या ते वैद्यकीय कारणास्तव जामीनावर बाहेर आहेत. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना कायमस्वरूपी वैद्यकीय जामीन दिला आहे. नवाब मलिक यांनी दाखल केलेल्या नियमित जामीन याचिकेवर जोपर्यंत मुंबई उच्च न्यायालय निर्णय देत नाही तोपर्यंत अंतरिम जामीन कायम राहील, असेही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर नवाब मलिक कोणत्या गटात जाणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत नव्हता. तसेच त्यांनी आपली भूमिकाही जाहीर केली नव्हती. मात्र, विधिमंडळ अधिवेशनात ते सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसल्याने ते अजित पवार गटात असल्याचे बोलले जात होते.