मोठी बातमी! अमोल मिटकरींच्या गाडीची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड

    30-Jul-2024
Total Views |
 
Amol Mitkari
 
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांच्या वाहनाची अकोल्यात अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. अमोल मिटकरींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली होती. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांकडून आता ही तोडफोड केल्याचे सांगण्यात येत आहे.
 
हे वाचलंत का? -  "पुड्या सोडणार्‍यांनी सरकारला तात्काळ पुरावे द्यावेत!"
 
राज ठाकरेंनी पुण्यातील पुरस्थितीवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली होती. यावर अमोल मिटकरींनी सुपारीबहाद्दरांनी अजितदादांबद्दल बोलू नये, असे म्हणत राज ठाकरेंवर पलटवार केला होता. दरम्यान, आता मनसे कार्यकर्त्यांनी याचा बदला म्हणून मिटकरींची गाडी फोडल्याचं बोललं जात आहे. यावेळी अकोल्यात मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी अमोल मिटकरींची गाडीची तोडफोड असून दोन्ही गटातील कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत.