घरवापसी! रिफा बनली रिया तर मेहक बनली सोनम; सनतान धर्मात येताच म्हणाल्या,...

03 Jul 2024 12:57:28
 Gharvapsi Bareilly UP
 
लखनौ : उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात दोन मुलींनी घरवापसी करत हिंदू धर्म स्वीकारला आहे. येथील अगस्त्य मुनी आश्रमात वैदिक विधींद्वारे मेहक खानम आता सोनम सक्सेना बनली आहे. तर रिफा नावाच्या मुलीला आता रिया सागर या नावाने ओळखले जाईल. या दोन्ही मुलींनी आपापल्या हिंदू प्रियकराशी लग्नही केले आहे. मेहक आणि रिफा यांनी हवन-पूजा केली आणि हिंदू देवी-देवतांची पुजा केली. हा घरवापसी कार्यक्रम सोमवार, दि. १ जुलै २०२४ पूर्ण झाला.
 
घरवापसी करणारी रिफा ही मूळची बरेलीची आहे. रिफाला तिच्या वडिलांनी आठवीपर्यंतच शिकवलं होतं. रिफाच्या म्हणण्यानुसार, शाळेत येताना तिची राहुल सागरसोबत भेट झाली. राहुल सागर हा अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील आहे. एके दिवशी राहुल सागरने रिफाकडे आपले प्रेम व्यक्त केले. रिफानेही राहुलचा प्रस्ताव स्वीकारला. यानंतर दोघेही वारंवार भेटू लागले. काही दिवसांनी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रिफाने पुढे सांगितले की, तिच्या कुटुंबीयांना हे नाते मान्य नव्हते.
 
रिफावर निर्बंध लादले गेले. इकडे राहुल सागर हा रिफाशी लग्नासाठी सतत प्रयत्न करत होता. अखेर दि. १ जुलै रोजी राहुल बरेली येथील अगस्त्य मुनी आश्रमात पोहोचला. रिफाही तिथे पोहोचण्यात यशस्वी झाली. या जोडप्याने आश्रमाचे पुजारी पंडित केके शंखधर यांना त्यांची सर्व महत्त्वाची कागदपत्रे दाखवली. रिफाने सांगितले की, तिच्यावर कोणतीही जबरदस्ती नाही. अखेर दोघांचा विवाह अगत्स्य मुनी आश्रमात झाला. लग्नानंतर रिफाने स्वेच्छेने घरवापसी केली. घरवापसीनंतर तिचे नाव रिया सागर ठेवण्यात आले. लग्नानंतर, स्वतःला खूप आनंदी असल्याचे सांगून, रिफा तिच्या पतीच्या घरी गेली.
 
रियासोबतचं मेहक खानम देखील बरेली येथील अगस्त्य मुनी आश्रमात हिंदू धर्मात परतली. शुद्धीकरणानंतर मेहक खानमचे नाव सोनम सक्सेना झाले. २२ वर्षीय सोनमने तिचा प्रियकर अंश सक्सेनासोबत आश्रमात वैदिक रितीरिवाजानुसार लग्न केले. मेहक खानम ही मूळची रामपूर, उत्तर प्रदेशची आहे. वडील इर्शाद अहमद कामानिमित्त बरेली येथे स्थायिक झाले होते.
 
मेहकने सांगितले दोघांनी एकमेकांना पाहिले आणि एकमेकांना आवडू लागले. काही दिवसांच्या भेटीनंतर मेहक आणि अंशने लग्न करण्याचा निर्णय घेतात. मेहकच्या कुटुंबीयांना तिचे हिंदू मुलासोबतचे संबंध मान्य नव्हते. मेहकला घरातून बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली होती. सोमवार, दि. १ जुलै मेहक तिच्या प्रियकरासह अगत्स्य मुनी आश्रमात पोहोचली. या दोघांनीही स्वत:ला प्रौढ असल्याचे घोषित करून आपली कागदपत्रे पंडित के.के.शंखधर यांना दिली. शुद्धीकरणानंतर मेहक सोनम सक्सेना झाली. लग्नानंतर ती पतीसोबत सासरी गेली.
 
घरी परतल्यावर रिफा आणि मेहक तिहेरी तलाक आणि हलाला यांना चुकीची परंपरा मानतात. त्या हिंदू देवी-देवतांची पूजा करणार असल्याचेही तिने सांगितले. लग्नादरम्यान, दोन्ही मुलींनी वैदिक विधींनुसार हवन-पूजा केली आणि हिंदू देवतांची पुजा केली. पंडित के.के.शंखधर यांनी दोन्ही नवीन जोडप्यांना आनंदाने जगण्याचा आशीर्वाद दिला.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0