“कटरिना भावनिक असल्यामुळे आमच्या नात्यात...”, विकीने लग्नानंतर बायकोबद्दल काय म्हटले?

29 Jul 2024 15:48:11

vicky and katrina 
 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कटरिना कैफ. २०२१ मध्ये या कपलने लग्नगाठ बांधली. दरम्यान, लग्नाच्या ३ वर्।नंतर विकीने त्याच्या पत्नी कटरिनाच्या नात्याबद्दल भाष्य केले आहे. नुकताच विकीचा बॅड न्यूज हा चित्रपट प्रदर्शित झाला. याच निमित्ताने दै. मुंबई तरुण भारतसोबत विकीने संवाद साधला होता.
 
विकी कौशल याने त्याच्या आणि पत्नी कटरिना कैफमधील नातेसंबंधांवर भाष्य करताना म्हटले की, “मी प्रॅक्टिल विचार करतो आणि कटरिना भावनिक आहे आणि सोबतच हुशारही आहे. त्यामुळे ज्या क्षणापासून आम्ही एकमेकांच्या जीवनाचे साथीदार झालो आहोत तेव्हापासून जगाकडे, करिअरकडे आणि स्वत:कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. आणि ज्यावेळी दोन वेगवेगळे दृष्टीकोन आपल्याला मिळतात तेव्हा नक्कीच एक माणूस म्हणूनही तुमच्यात आमुलाग्र बदल होतात आणि आम्ही दोघेही मनोरंजन क्षेत्रात काम करत असल्यामुळे परिणामी कलाकार म्हणूनही आमची प्रगती फार उत्तम होत जाते”.
 
दरम्यान, आत्तापर्यंत विकी कौशल आणि कटरिनाने एकत्रित एकाही चित्रपटात काम केले नाही आहे. परंतु, त्यांना एकत्रित मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता आहे. कटरिना ‘मेरी क्रिसमस’ या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपतीसोबत झळकली होती. तर लवकरच तिला ‘टायगर वर्सेस पठाण’ चित्रपट येणार आहे.
Powered By Sangraha 9.0