प्रसिद्ध मराठी संगीतकार, गायक व नट यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगीतभूषण पंडित राम मराठे फाऊंडेशनतर्फे ‘संगीत मंदारमाला’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई मराठी साहित्य संघ, कलाभारती यांच्या सहकार्याने या नाटकाचे आयोजन करण्यात आलेले आहे. शनिवारी (दि. ३ ऑगस्ट) दुपारी ३:३० वाजता दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात या नाटकाचा प्रयोग होणार आहे. सौ. वीणा नाटकर आणि संजय मराठे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. मुकुंद मराठे यांनी या नाटकाला संगीत दिले आहे. सुधीर ठाकूर यांनी नेपथ्य आणि सौरभ शेठ यांनी प्रकाशयोजना सांभाळली आहे. दीपक गोडबोले या नाटकाचे सूत्रधार आहेत. प्राजक्ता मराठे, सुधांशु सोमण, प्रिया टिपले देव, रमेश चांदणे, मकरंद पाध्ये आणि भाग्येश मराठे इत्यादी कलाकार या नाटकात असणार आहेत.