आयटीआर भरण्याकरिता मुदत वाढ करा; भाजप नेत्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती

29 Jul 2024 18:10:56
itr return bjp former mla request
 

मुंबई :       आयकर विभागाने आयटीआर फाईलिंगकरिता करदात्यांना अंतिम मुदत ३१ जुलै असणार आहे. करदात्यांना अंतिम मुदतीआधीच कर भरणा करावा लागणार आहे. तसेच, अंतिम मुदत नजीक आली असताना करदात्यांकडून कर भरणा होत असून दररोज १३ लाख करदाते कर भरत असल्याचे आयकर विभागाकडून सांगण्यात आले. त्यानंतर आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना निवेदनाद्वारे मुदतवाढीची मागणी करण्यात आली आहे.




दरम्यान, भाजप माजी आमदार अतुल शहा यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना आयटीआर भरण्याची अंतिम तारीख वाढवून द्यावी, अशी विनंती केली आहे. त्यांनी पत्रात नमूद केले की, संपूर्ण जुलै महिन्यात सर्व देशवासीयांना असामान्य आणि संततधार पावसाचा सामना करावा लागला. पावसामुळे सर्वांचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून मुंबई, उत्तर प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील प्रमुख क्षेत्रे आणि इतर राज्यांमध्ये दिवसभर पुराचा सामना करावा लागला आहे, असे शहांनी म्हटले आहे.

या परिस्थितीत सुमारे १० दिवसांसाठी आयटीआर भरण्यासाठी मुदतवाढ मिळाली तर देशातील प्रत्येकाला सुटका मिळेल. मला खात्री आहे की, सर्व सनदी लेखापाल आणि करदात्यांच्या चेहऱ्यावर फक्त तुम्हालाच कळले असेल की ते त्यांचे आयटी रिटर्न भरण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत. रिटर्न भरण्यासाठी कृपया वाढीव तारखेची चांगली बातमी जाहीर करावी, असे अतुल शहा यांनी निवेदनात नमूद केले आहे.



Powered By Sangraha 9.0