‘दुर्गा वाहिनी सोड, अन्यथा तुला मारून टाकू’ : विहिंपच्या महिला कार्यकर्त्यावर सादिक खानचा हल्ला

29 Jul 2024 14:06:18

VHP Durgavahini News

मुंबई (प्रतिनिधी) : (VHP Durgavahini News) 
गुजरातच्या कच्छमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या महिला कार्यकर्त्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. दि. २७ जुलै रोजी सांतालपूर, पाटण येथील सिंदरा गावात सादिक खान नावाच्या व्यक्तीने दुर्गा वाहिनीच्या स्वयंसेविकेवर हल्ला केला आणि नंतर तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. यासंदर्भात सांतालपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलंत का? : भारतीय मुस्लिमांसाठी यापुढे ‘कायदेशीर’ बालविवाह नाही? केरळ हायकोर्टाने ठेवला नवा आदर्श

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला तिच्या कुटुंबीयांसह गावात राहते, तर घटनेतील आरोपी सादिक खान हाही त्याच गावचा आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, एफआयआरमध्ये तिने म्हटले आहे की, काम संपवून ती तिचा जवळचा भाऊ गमन भारवाड याच्यासोबत दुचाकीवरून घरी परतत असताना सायंकाळी साडेसातच्या सुमारास केमिकल फॅक्टरीजवळ तिची सादिकशी भेट झाली. महिलेने सादिकला असे का केले असे विचारले असता कोणतेही उत्तर न देता सादिकने तिचे केस पकडून मारण्यास सुरुवात केली. यावेळी सादिकने सोबत असलेल्या व्यक्तीला विहिंप कार्यकर्त्याला गाडीत बसवण्यास सांगितले. फिर्यादीनुसार, तेथून निघण्यापूर्वी सादिकने महिलेला धमकावून सांगितले की, "दुर्गा वहिनीचे काम सोड, अन्यथा तुला मारून टाकीन."

घटनेनंतर दुर्गावाहिनी सेविका रमिलाने कुटुंबीयांना माहिती दिली आणि सर्वांनी सांतालपूर पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी सादिकविरुद्ध भारतीय न्यायिक संहितेच्या संबंधित कलमे आणि गुजरात पोलिस कायद्याच्या कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून कारवाई सुरू आहे. दुसरीकडे पाटणच्या दुर्गा वाहिनीच्या स्वयंसेवकावर हल्ल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि गुजरातच्या दुर्गा वाहिनीसह हिंदू संघटनांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

Powered By Sangraha 9.0