नवी दिल्ली : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्यासमोर सुनावणी पार पडली. दरम्यान, न्यायालयाने अजित पवारांसह त्यांच्या ४१ आमदारांना नोटीस बजावली आहे. तसेच हे दोन्ही प्रकरण सारखे असल्याने यावर एकाचदिवशी पण स्वतंत्र सुनावणी होणार आहे.
हे वाचलंत का? - यशश्री शिंदेवर बलात्कार? मरणानंतरही पीडितेला यातना! पोस्टमार्टममध्ये धक्कादायक बाब उघड
सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला येत्या ८ दिवसांत आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. तुम्हाला का अपात्र करु नये, याबाबत आपले म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे. हे दोन्ही प्रकरण सारखे असल्यामुळे एकाच दिवशी पण स्वतंत्र सुनावणी होणार असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. तसेच येत्या ३ सप्टेंबर रोजी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आपात्रतेप्रकरणी पुढील सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, येत्या सप्टेंबर महिन्यात आमदार अपात्रतेबद्दल निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.