शरद पवारांना महाराष्ट्रात मणिपूरसारख्या दंगली घडण्याची चिंता! काय म्हणाले?

29 Jul 2024 17:13:13
 
Sharad Pawar
 
नवी मुंबई : शरद पवारांनी महाराष्ट्रातही मणिपूरसारख्या दंगली घडण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. नवी मुंबईमधील वाशी येथे आयोजित सामाजिक ऐक्य परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मणिपूरच्या मुद्दावर भाष्य करत चिंता व्यक्त केली.
 
शरद पवार म्हणाले की, "आज महाराष्ट्रात आणि देशात जी काही परिस्थिती आहेत त्यात बदल करण्याची गरज आहे. हा बदल करण्यासाठी जात-पात, धर्म आणि भाषा यामध्ये असलेल्या अंतराचं विस्मरण करुन एकसंघ समाज आणि एकसंघ राष्ट्र ही संकल्पना घेत आपल्याला एकत्रित काम करण्याची गरज आहे."
 
हे वाचलंत का? -  "फडणवीसांना डॅमेज करण्याचा प्रयत्न होतोय!, पण महाराष्ट्राची जनता त्यांच्या मागे उभी आहे"
 
"देशाच्या संसदेत मणिपूरवर चर्चा झाली. पिढ्यानुपिढ्या एकत्र असलेला हा लहानसा समाज अस्वस्थ झाला. दोन जमातींमध्ये संघर्ष झाला. घरं आणि शेती उध्वस्त झाले. स्त्रियांवर अत्याचार झाले. एका राज्यावर एवढं मोठं संकट आलं असताना त्याला सामोरं जाणं आणि लोकांना विश्वास देणं ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांनी त्याच्याकडे ढुंकुनही बघितलं नाही. मणिपूर जळल्यानंतर देशाच्या पंतप्रधानांना तिथे जाऊन लोकांना दिलासा द्यावं असं वाटलं नाही. आजूबाजूच्या राज्यांमध्येही हे घडलं. कर्नाटकमध्येही घडलं. अलीकडच्या काळात त्यामुळे महाराष्ट्रातली असं घडेल का, अशी चिंता वाटते," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "सुदैवाने महाराष्ट्राला एक दिशा देणारे अनेक युगपुरुष होऊन गेले आहेत. त्यांनी समाजाचा विचार केला. आज देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक राज्य होऊन गेले. पण ३५० वर्ष झाल्यानंतरही इतक्या वर्षात तुम्हाला अभिमान वाटावा असा कोणता राजा होऊन गेला? असा प्रश्न विचारल्यास छत्रपती शिवाजी महाराज हे एकच नाव निघतं," असेही ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0