ऑल्मिपिकमध्ये खेळाडूने दिले अल्लाहू अकबरचे नारे!

    29-Jul-2024
Total Views |

Paris Olympic


पॅरीस
: सध्या ऑलिम्पिकचा उत्साह शीगेला पोहोचला आहे. भारतीय खेळाडूंनीही पदकांचा श्रीगणेशा केला आहे. मात्र, काही कट्टरपंथींनी या सोहळ्यालाही गालबोट लावले आहे. काही मुस्लीम खेळाडूंनी इस्त्रायल पॅलेस्टिनचा मुद्दा ऑलिम्पिकमध्येही उपस्थित केला आहे. ताजिकिस्तानी जुडो खेळाडूने इस्त्रायलच्या खेळाडूशी हात मिळविण्यास नकार दिला आणि अल्लाह हू अकबरचे नारे दिले.
मात्र, यानंतर पुढच्याच फेरीत तो जखमी झाला. यानंतर ऑलिम्पिक आयोजित समीतीने ईसाई धार्मिकांच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागितली आहे. पॅरीस ऑलिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी दि. २८ जुलै रोजी, रविवारी ताजिकिस्तानचे जुडो खेळाडून नुराली एमोमालीचा इस्त्रायलचा खेळाडून तोहार बुत्बुलशी सामाना होता. यात एमोमालीने बुत्बुलला पराभूत केले. त्यानंतर सामना संपल्यानंतर एमोमालीने खिलाडू वृत्ती व खेळाची परंपरा पाळण्यास नकार दिला.
एमोमालीने बुत्बुलशी हात मिळवणी करण्यास नकार दिला आहे. मुस्लीम असल्याने आपण पॅलेस्टाईनला समर्थन देत असल्याचा संदेश त्याला द्यायचा होता. इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सध्या युद्ध सुरू आहे. यानंतर इस्त्रायली खेळाडूशी हातमिळवणी केली नाही. त्यानंतर अल्लाह हू अकबरचे नारे दिले. त्यानंतर एमोमालीचे जपानी खेळाडूंशी वाद झाले. जपानी खेळाडू हिफुमी आबेने एमोमालीला सामन्यात हरवलं. इतक्या जोरात चितपट केलं की, त्याच्या खांद्याला दुखापत झाली. आबेने या नंतर स्वर्णपदक नावावर केले, मात्र एमोमालीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.