एस डी आणि आर डी बर्मन यांना आदरांजली वाहण्यासाठी ‘म्युझिकल वर्ल्ड ऑफ बर्मनचे’ आयोजन

    29-Jul-2024
Total Views |

burman
विलेपार्ले येथील ‘सूर-ताल’ या संस्थेतर्फे प्रसिद्ध संगीतकार एस डी बर्मन व आर डी बर्मन यांना संगीतमय आदरांजली वाहण्यासाठी ‘म्युझिकल वर्ल्ड ऑफ बर्मन’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गिरगाव मधील चित्तपावन ब्राह्मण संघ येथे शनिवारी (दि. ३ ऑगस्ट) रोजी सायंकाळी ५:४५ ते ८:३० या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.
 
एस डी बर्मन व आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचे सादरीकरण या कार्यक्रमामध्ये होणार आहे. गायिका अमृता, संध्या व गायक यशवंत, रुदय, अमर हे कलाकार या कार्यक्रमामध्ये सादरीकरण करणार आहेत. आकाशवाणीच्या आरजे पद्मजा बापये या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.
 
यांच्यासाठी 'सुर ताल'चे व्यासपीठ कायम उपलब्ध असते. गतवर्षी गानसम्राज्ञी 'भारतरत्न लता मंगेशकर' आणि 'संगीतकार बप्पी लाहिरी' यांना संगीतमय आदरांजली वाहणारी ‘सांज ये गोकुळी’ ही बहारदार सुरेल मैफिल 'सूर-ताल'ने आयोजित करून गिरगांवकरांची पसंती मिळविली होती.