"फडणवीसांना डॅमेज करण्याचा प्रयत्न होतोय!, पण महाराष्ट्राची जनता त्यांच्या मागे उभी आहे"

29 Jul 2024 16:33:53
 
Bawankule
 
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खलनायक करुन त्यांना डॅमेज करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे. प्रकाश आंबेडकरांनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.
 
मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नकली भांडण सुरु आहे. फडणवीस आणि उद्धव ठाकरेंना ओबीसींच्या प्रश्नाशी देणंघेणं नाही, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. यावर आता चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रकाश आंबेडकरांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
 
हे वाचलंत का? -  अनिल देशमुखांचं डोकं फिरलंय : समीत कदम
 
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "प्रकाश आंबेडकर राजकारणासाठी बोलले असतील. पण देवेंद्र फडणवीसांना मराठा आरक्षणात कारण नसताना खलनायक करण्यात येत आहे, हे त्यांनासुद्धा माहिती आहे. मराठा आरक्षण देण्यासाठी शरद पवार जे ४० वर्षात करु शकले नाहीत ते फडणवीसांनी करुन दाखवलं. आम्ही मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात योजना दिल्या."
 
"प्रकाश आंबेडकरांना त्यांच्या राजकारणासाठी बोलावं लागतं. पण देवेंद्र फडणवीस मराठा समाजाच्या विषयात प्रमाणिक आहेत. तरीसुद्धा काही सामाजिक आंदोलनकर्ते देवेंद्रजींना खलनायक करुन त्यांच्यावर व्यक्तीगत टीका करत आहेत. तसेच त्यांची उंची कमी करुन त्यांना डॅमेज करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण महाराष्ट्रातील जनेतेने देवेंद्रजींच्या कामाला पूर्वीपासून मान्य आहे आणि ती त्यांच्या पाठीशी उभी आहे," असेही ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0