धारावीत कट्टरपंथीयांकडून हिंदू युवकाची हत्या!

    29-Jul-2024
Total Views | 1008

Arvind Vaishya

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Arvind Vaishya news)
केवळ दोन जणांमधील वाद सोडवल्याच्या कारणावरून अरविंद वैश्य (२६) या हिंदु युवकाची काही कट्टरपंथीयांनी चाकू भोसकत निर्घृणपणे हत्या केल्याची घटना धारावीमध्ये घडली आहे. रविवार, दि. २८ जुलै रोजी राजीव गांधी नगर, धारावी येथे सदर घटना घडली असून आरोपी नियाज शेख (अल्लू) व आरीफ यांच्याविरोधात धारावी पोलिस स्थानकात कायदेशीर तक्रार नोंदविण्यात आली आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी अरविंद यांचे भाऊ शैलेंद्र कुमार वैश्य व समस्त हिंदू बांधवांनी केली आहे.

हे वाचलंत का? : नालासोपारा येथे २५ महिलांशी विवाह करणाऱ्या फिरोजला अटक!

अरविंद वैश्य हा एका मेडिकल मध्ये कामाला होता. त्याच्या मिळणाऱ्या उत्पन्नावर घराचा खर्च चालायचा. शैलेंद्र कुमार यांनी केलेल्या तक्रारीनुसार, रविवार रात्री मित्र राकेश कदम याने अरविंद यास अल्लू, आरीफ, शुभम, शेरअली मारत असल्याची माहिती फोनवरून दिली. वास्तविक या चारही जणांचा वाद सिद्धेश व त्याच्या वडिलांसोबत होता. वाद मिटवण्यासाठी अरविंद याने मध्यस्थी केली तेव्हा त्यासही आरोपींनी मारहाण केली. याची तक्रार नोंदविण्यासाठी अरविंद आणि सिद्धेश धारावी पोलिस स्थानकात गेले होते. त्यानंतर अरविंद पोलिसांसह धारावीतील राजीव गांधीनगर येथे येत असताना एका गल्लीत अल्लू, आरीफने हातातील चाकू अरविंदच्या छातीत भोसकला. त्यात अरविंद गंभीर जखमी झाला. तेव्हा पोलिसांनी अल्लू यास पकडले. मात्र सायन हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी अरविंदला मृत घोषित केले. यासंदर्भात पोलिसांत तक्रार केली असता आरोपी नियाज शेख (अल्लू) व आरीफ यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०३(२), कलम ३५१ (२) कलम ३(५) ठोठावण्यात आले आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा
सर्वसमावेशक विकासासाठी पतपेढी चळवळ आवश्यकच : विद्याधर अनास्कर

सर्वसमावेशक विकासासाठी पतपेढी चळवळ आवश्यकच : विद्याधर अनास्कर

2025 हे वर्ष संयुक्त राष्ट्राने ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. याच सहकार क्षेत्राचे जाळे महाराष्ट्रात खूप खोलवर रुजले आहे. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे सहकारी वित्तीय संस्था आणि या वित्तीय संस्थांमधील महत्त्वाचा भाग म्हणजे, सहकारी पतसंस्था म्हणजेच सहकारी पतपेढी. सर्वसामान्य माणसांच्या जवळच्या आणि त्यांच्या अर्थकारणातही या पतसंस्थांना आजही जिव्हाळ्याचे स्थान आहे. पण, आज याच पतसंस्थांची चळवळ ही काही गैरप्रकारांमुळे संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. त्यानिमित्ताने पतसंस्थांच्या अर्थकारणाचा, ..