आकाश बनून नसीमने केली महिलेची फसवणूक, वाचा संपूर्ण प्रकरण!

28 Jul 2024 18:38:33
uttar-pradesh-bijnaur-naseem-married-hindu-woman


नवी दिल्ली :       उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील नसीम याने आकाश असल्याचे भासवत पंजाबमधील मोहाली येथील एका विवाहित महिलेला आपल्या जाळ्यात ओढले. महिलेला तिच्या पतीपासून घटस्फोट मिळाल्यानंतर नसीमने तिच्याशी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. परंतु, महिलेला जेव्हा सत्य समजले तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर तिने नसीमविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वास्तविक, बिजनौर शहरातील कोतवाली भागात असलेल्या फरीदपूर काजी उर्फ ​​खेरकी येथील रहिवासी नसीम चंदीगडमधील मोहाली येथे सुताराचे काम करतो. तेथे त्याची महिलेशी ओळख झाली. त्या महिलेचे आधीच लग्न झाले होते. महिलेने सांगितले की, नसीमने तिला आपले नाव आकाश सांगत आपल्याशी मैत्री केली. यानंतर हळूहळू त्याने तिच्याशी जवळीक वाढवली. तसेच, नसीमने विवाहितेला आकाशचे भासवून फसवत पतीपासून घटस्फोट करवून घेतला.

दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी नसीम उर्फ ​​आकाश, भाऊ वसीम, वडील शमीम आणि काका हसील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नसीमच्या विरोधात फसवणूक विवाह आणि प्राणघातक हल्ला या कलमान्वये त्याच्या आणि त्याच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.





Powered By Sangraha 9.0