उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील आधुनिक औरंग्या!

27 Jul 2024 12:54:11
 
Thackeray
 
मुंबई : उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील आधुनिक औरंग्या आहेत, अशी सणसणीत टीका भाजप आमदार नितेश राणेंनी केली आहे. औरंगजेबाचे तंतोतंत गुण ठाकरेंनी घेतले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. शनिवारी पत्रकार परिषद घेत राणेंनी ठाकरे आणि राऊतांवर जोरदार निशाणा साधला.
 
नितेश राणे म्हणाले की, "आज महाराष्ट्राच्या आधुनिक औरंग्याचा वाढदिवस आहे. ज्या औरंग्याने स्वत:च्या आईवडिलांना आणि भावालाही सोडलं नाही त्याचे तंतोतंत गुण या आधुनिक औरंग्याने घेतले आहेत. ज्या उद्धव ठाकरेंना स्वत:चं कुटुंब सांभाळता आलं नाही ते महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख कधीच होऊ शकत नाहीत. त्यांनी आधी स्वत:चं कुटुंब सांभाळावं."
 
हे वाचलंत का? -  नवी मुंबईत तीन मजली इमारत कोसळली! दोघांचा मृत्यू
 
"जो स्वत:चं कुटुंब सांभाळू शकत नाही तो महाराष्ट्राचा कुटुंबप्रमुख कसा होईल, याचं उत्तर संजय राऊत आणि ठाकरेंच्या समर्थकांनी द्यावं. हा आधुनिक औरंग्या महाराष्ट्रातील हिंदू समाजाच्या विरोधात जिहादहृदय सम्राट बनू पाहतोय. आज प्रत्येक जिहादी त्यांचं नाव घेत आहे. ते जिहादहृदयसम्राट हे महाराष्ट्राच्या नावावर लागलेला कलंक आहे. त्यामुळे त्यांचा कुणी भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करु नये. उद्धव ठाकरेंनी विशाळगडावरील अतिक्रमणावर एकदा तरी बोलले का? तुमच्या रक्तात औरंग्या भिनलेला आहे. त्यामुळे उगाच शिवरायांचं नाव घेऊ नका," असेही ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0