नवी मुंबई : नवी मुंबईतून एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शनिवारी पहाटे नवी मुंबईत एक तीन मजली इमारत कोसळली आहे. यात २ दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी बचावपथक दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे.
गेले ४ ते ५ दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, आता नवी मुंबईतील शाहबाज गावाताली तीन मजली इमारत अचानक कोसळली. या इमारतीत एकूण २४ कुटुंबे राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील ५२ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या उपस्थितीत बचावकार्य सुरू आहे.
हे वाचलंत का? - उबाठा गटाला ठाण्यात मोठं खिंडार! युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिवसेनेत प्रवेश
मागील आठवड्यातही अशीच एक घटना घडली होती. मुंबईतील ग्रँट रोड परिसरात एका इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर चार जण जखमी झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा अशीच एक घटना घडली आहे.