पुण्यातील जनजीवन पूर्वपदावर

27 Jul 2024 16:14:46

Pune
 
पुणे: दोन दिवस झालेल्या पावसामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्यानंतर परिस्थिती पुर्वपदावर आली आहे. पाण्याखाली गेले पूल आणि रस्त्यावरील पाणी पुर्णपणे ओसरुन रस्ते वाहतूकीसाठी खूले झाले आहेत. संततधार पावसामुळे विस्कळीत झालेले जनजिवन आता पूर्वपदावर येत आहे.
 
पुण्यातील भिडे पुलावरील पाणी ओसरले आहे. तर बाबा भिडे पूल आणि नदीपात्राच्या पुलावरुन वाहतूकीला देखील सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान खडकवासला धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे खडकवासला धरण १०० टक्के भरले असल्यामुळे दोन दिवसांपूर्वी खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे भिडे पूल पाण्याखाली जाऊन त्या पूलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती परंतू आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पुण्यातील जनजिवन पुन्हा पुर्वपदावर आली आहे. 
 
 
Powered By Sangraha 9.0