"ज्यांची हयात उद्धवजींच्या डोक्यावर..."; केशव उपाध्येंचा संजय राऊतांवर हल्लाबोल

27 Jul 2024 14:32:31
 
Thackeray & Raut
 
मुंबई : ज्यांची हयात उद्धवजींच्या डोक्यावर छत्री धरण्यात गेली त्यांनी देवेंद्र फडणवीवसांवर यांच्यावर कोण छत्र-चामरं ढाळताहेत, याची उठाठेव करू नये, असा हल्लाबोल भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी संजय राऊतांवर केला आहे. संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
 
 
 
केशव उपाध्ये म्हणाले की, "ज्यांची हयात उद्धवजींच्या डोक्यावर छत्री धरण्यात गेली त्यांनी देवेंद्र फडणवीवसांवर यांच्यावर कोण छत्र-चामरं ढाळताहेत, याची उठाठेव करू नये. उलट, संजय राऊत आपणच पावसाळी बेडकासारखं डरांव डरांव करत खोटं नरेटीव्ह पसरवत राहू नका."
 
हे वाचलंत का? -  अजितदादांचा आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर!
 
"देवेंद्रजींवर चिखलफेक करताना तुम्ही राजकीय कृतीसाठी तुरूंगात गेल्याचा आव आणलात. प्रत्यक्षात घोटाळ्यात हात बरबटल्यामुळे जेलवारी करून यावी लागली, हे सत्य मात्र विसरू नका. ज्या मराठी माणसाच्या नावावर तुम्ही मतं मागता, त्याच्याच नरडीला नख लावून हे घोटाळे तुम्ही केलेत. त्यामुळे उबाठा गटालाच येत्या निवडणुकीत त्यांचा तळतळाट भोवल्याशिवाय राहणार नाही," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "एकच उदाहरण देतो, देवेंद्रजींनी मुंबईला मेट्रो आणि महाराष्ट्राचे पूर्व टोक मुंबईला जोडणारा समृद्धी महामार्ग दिला. उद्धवजींनी मुंबईकरांना कोरोनामुक्तीच्या नावाखाली भ्रष्टाचार आणि सुशासनाच्या नावाखाली अनाचार दिला," असा टोलाही केशव उपाध्ये यांनी संय राऊतांना लगावला आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0