फेरीवाल्यांचा प्रश्न राज्य शासनाने मार्गी लावावा!

माजी खासदार गोपाळ शेट्टींचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र!

    27-Jul-2024
Total Views |
Gopal Shetty on hawker


मुंबई :
मुंबईतील फेरीवाल्यांचा प्रश्न न्यायालयामार्फत सुटणार नसून राज्य शासनाने त्यावर मार्ग काढावा, अशी मागणी माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मुंबई शहाराची वाढती लोकवस्ती लक्षात घेता फळ, फुले, भाजीपाला विक्रीसाठी मंडईची गरज आहे. मात्र मुंबई विकास नियोजन आराखडा २०३४ नुसार आरक्षित मार्केट्स बांधलेली नाहीत. त्यामुळे येत्या काळात मुंबईकरांना समस्येला सामोरे जावे लागणार आहे. याकडे पत्राच्या माध्यमातून शेट्टी यांनी शासनाचे लक्ष वेधले.

दरम्यान मुंबईकारांना लागणाऱ्या फळ, फुले, भाजीपाला विकण्यासाठी व्यवस्था करणे हे मुंबई महापालिकेची जबाबदारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मुंबई शहराला जागतिक दर्जाचे शहर बनविण्याचा विचार मांडल्यामुळे मुंबई शहराला झोपडपट्टी मुक्त आणि फेरीवाले मुक्त मुंबई करण्यासाठी उपाय योजना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सर्वेाच्च न्यायालयाने १९८५ पासून फेरीवाला झोन बनविण्यासाठीचा प्रस्ताव मार्गी लागत नसल्याने आता न्यालयामार्फत हे प्रश्न सुटणार नसून शासन प्रशासनाने फेरीवाल्यांची व्यवस्था करून मार्ग काढला पाहिजे, अशी विनंती माजी खासदार गोपाळ यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

 
फेरीवाले ही समस्या नाही....

फेरीवाले ही एक समस्या नसून एक व्यवस्था आहे त्याचे नीटनेटकेपणाने व्यवस्थापन करणे राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि सर्व राजकीय पक्षातील नेत्यांची जबाबदारी आहे.

गोपाळ शेट्टी, माजी खासदार