‘तारक मेहता…’ मधील या कलाकाराने १६ वर्षांनी मालिकेला केला रामराम

    27-Jul-2024
Total Views |

tarak meheta 
 
 
 
मुंबई : दयाबेन, जेठालाल यांचे चाहते प्रेक्षकांमध्ये नसतील असं फार क्वचितच असेल नाही. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही विनोदी मालिका गेले १६ वर्ष प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. या दरम्यान, अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली त्यात सगळ्यांची लाडकी दयाबेन देखील आहेच. पण गेले अनेक वर्ष दया या मालिकेत नसूनही तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेची लोकप्रियता काही कमी झाली नाही. आता या मालिकेतून आणखी एका कलाकाराने शो सोडल्याची बातमी समोर आली आहे.
 
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत ‘गोली’ ही भूमिका साकारणाऱ्या कुश शाहने मालिकेतून निरोप घेतला आहे. तब्बल १६ वर्षींनी त्याने ही मालिका सोडली असून भावूक होत त्याने प्रेक्षकांसाठी खास व्हिडिओ देखील त्याने शेअर केला आहे.
व्हिडीओमध्ये कुश म्हणाला की, “जेव्हा हा शो सुरू झाला, तेव्हा तुम्ही आणि मी पहिल्यांदा भेटलो होतो, मी खूप लहान होतो. तेव्हापासून तुम्ही मला खूप प्रेम दिले. तुम्ही मला जेवढे प्रेम दिले आहे तेवढेच प्रेम या कुटुंबाने मला दिले आहे. माझ्या इथे खूप आठवणी आहेत. इथे काम करताना खूप मजा आली. मी माझे बालपण इथे घालवले आहे. मी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माते असित कुमार मोदी यांचे आभार मानू इच्छितो. त्यांनी माझ्यावर खूप विश्वास दाखवला, माझे पात्र खूप मनोरंजक बनवले आणि मला नेहमीच प्रेरित केले. त्यांच्या विश्वासामुळेच कुश ‘गोली’ बनू शकला.”
 
पुढे तो म्हणाला की, “मी या शोला निरोप देत आहे. मात्र, तुमचे प्रेम कायम आठवणीत राहील. पण हो, फक्त मी, कुश शाह या शोचा निरोप घेत आहे. तुमचा गोली तसाच राहील. तोच आनंद, तेच हास्य व तीच मस्ती. या शोमध्ये अभिनेता बदलू शकतो, पण पात्र नाही”. दरम्यान, आतापर्यंत या मालिकेतून दिशा वकानी, शैलेष लोढा, जेनिफर मिस्त्री, गुरुचरण सिंगसह काही कलाकारांनी या शोला रामराम केला आहे.