दोषींवर कठोर कारवाई करा! नवी मुंबई इमारत दुर्घटेनंतर फडणवीसांचे आदेश

27 Jul 2024 13:05:01
 
Fadanvis
 
मुंबई : नवी मुंबई इमारत दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करा, असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत. नवी मुंबईत शनिवारी पहाटे एक तीन मजली इमारत कोसळली असून यात २ दोन जणांचा मृत्यू आहे. तसेच अनेकजण ढिगाऱ्याखाली दबले असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
 
 
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "नवी मुंबई भागात शहाबाजगाव येथे आज पहाटे ४ मजल्यांची एक इमारत कोसळल्याची घटना घडली असून त्यातील सुमारे ५० निवासींना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तसेच २ लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे."
 
हे वाचलंत का? -  उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील आधुनिक औरंग्या!
 
"ढिगाऱ्याखाली २ नागरिक दबले असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. एनडीआरएफची चमू लगेच घटनास्थळी पाचारण करण्यात आली. नवी मुंबई महापालिका आयुक्तसुद्धा तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. बाहेर काढलेल्या नागरिकांची महापालिकेच्या निवारा केंद्रात व्यवस्था करण्यात आली आहे. या घटनेत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश नवी मुंबई महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत," अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0