प्रदुषणाला आळा घालण्यासाठी न्यायालयाची प्लास्टिक बंदी!

    27-Jul-2024
Total Views |
Ban on Single-Use Plastics

मुंबई :
प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदुषणाला रोखण्यासाठी आता मुंबई उच्च न्यायालयाने पुढाकार घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एकल प्लास्टिक वापराच्या पिशव्या, बाटल्या यावर बंदी घालण्यासंदर्भात परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.प्लास्टिकच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत असते. त्यामुळे सरकारने विशिष्ट प्लास्टिवर बंदी घातलेली आहे.

न्यायालयातही या प्लास्टिकच्या वापरामुळे होणाऱ्या प्रदुषणाला रोखण्यासाठी पर्यावरणप्रेमींकडून याचिका दाखल केल्या जातात. यासर्व बाबींची नोंद घेत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी प्लास्टिकला आळा घालण्यासाठी एकल प्लास्टिकच्या वापरातील पिशव्या, बाटल्या यांच्यावर बंदी घातली आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कारवाई केली जाईल, असे ही न्यायालयाच्या रजिस्ट्रारने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हंटले आहे.