"मंगळसूत्र घालू नका, सिंदूर लावू नका, तुम्ही हिंदू नाहीत"; सरकारी शाळेतील शिक्षिकेची वनवासी महिलांना शिकवण

26 Jul 2024 15:02:34
 teacher
 
जयपूर : राजस्थानमध्ये वनवासी महिलांना हिंदू नसल्याचे शिकवणाऱ्या सरकारी शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे. मनेका डामोर असे या शिक्षिकेचे नाव आहे. तिच्यावर राजस्थान आचारण नियमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. बांसवाडा येथील मानगढ धाम येथे दि. १९ जुलै रोजी आयोजित केलेल्या विशाल रॅलीत मनेका यांनी एका जाहीर सभेत वनवासी महिलांना हिंदू धर्माचे नियम पाळू नका असे सांगितले होते.
 
ती म्हणाली होती की, "वनवासी कुटुंबे सिंदूर लावत नाहीत, मंगळसूत्र घालत नाहीत. वनवासी समाजातील महिला व मुलींनी शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. आजपासून सर्व उपवास बंद करा. आम्ही हिंदू नाही.” शिक्षेकेच्या वक्तव्यावर आधी वनवासी समाजातील महिलांनी आक्षेप घेतला आणि त्यानंतर शासनाच्या शिक्षण विभागाने यावर कारवाई करून त्यांना निलंबित केले. वनवासी महिलांना सिंदूर लावू नका आणि मंगळसूत्र घालू नका, असे सांगणाऱ्या महिला शिक्षिका मनेका डामोर यांना राजस्थानच्या शिक्षण विभागाने निलंबित केले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, मेनका डामोर या एका गैर सरकारी संघटनेच्या अध्यक्ष आहेत. त्या साडा येथील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यरत आहेत. या कार्यक्रमात हजारो वनवासी महिलांनी हजेरी लावली होती. याचं कार्यक्रमात त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले.
 
 
Powered By Sangraha 9.0