गो-तस्करांवर पोलिसांची मोठी कारवाई; उत्तराखंडात लपून बसलेल्या आरोपींना ठोकल्या बेड्या!

    26-Jul-2024
Total Views |

Gotaskar Uttarakhand

मुंबई (प्रतिनिधी) : (Wanted Gotaskar)
पोलिसांच्या नजरेतून १२ वर्ष दूर राहिलेल्या गोहत्या आणि गो तस्करीच्या दोन आरोपींना दून पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही आरोपी सहारनपूरचे आहेत. उत्तर प्रदेशातही त्यांच्यावर गँगस्टर कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपी उत्तराखंडमध्ये लपून बसले असून ते गोवंश तस्करीच्या गुन्ह्यात सामील असल्याची माहिती मिळत आहे.

हे वाचलंत का? : "दहशतवाद्यांच्या आश्रयदात्याला ठेचून काढू"; पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्लेमेंट टाऊन पोलीस ठाण्यात गायींसंदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला होता. कत्तल, अवैध मांस तस्करी आणि प्राणी क्रूरतेच्या कलमांतर्गत आरोपींनी गुन्हे केल असून गेल्या १२ वर्षांपासून फरार होते. पोलीस पथकाने यापूर्वी संशयित अड्ड्यांवर छापे टाकले होते, मात्र आरोपी पोलिसांच्या पथकाला चकमा देऊन फरार होत होते, ज्यांच्या विरोधात कोर्टाने कायमस्वरूपी वॉरंट जारी केले होते आणि आरोपी सतत फरार असल्याने एसएसपी डेहराडून यांनी दोघांवर प्रत्येकी ५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

आरोपींना पकडण्यासाठी क्लेमेंटटाऊन पोलिस स्टेशन आणि एसओजीची संयुक्त टीम तयार करण्यात आली होती. हरिद्वार जिल्ह्यातील मंगळूर शहरात आरोपी लपून बसल्याची माहिती खबऱ्यांमार्फत मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने पथक हरिद्वार जिल्ह्यात पाठवून दोन्ही आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी सहारनपूरचे गुंड असून, ते गोहत्या आणि अवैध मांस तस्करीमध्ये दीर्घकाळ गुंतलेले होते. या दोन्ही आरोपींवर डेहराडून तसेच सहारनपूरमध्ये चोरी, अवैध मांस तस्करी, एनडीपीएस कायद्यानुसार अनेक गुन्हे दाखल आहेत.