जोधपूर येथे विश्व हिंदू परिषदेची केंद्रीय कार्यकारी समिती बैठक

बेकायदेशीर धर्मांतरण, लोकसंख्या असंतुलनसारख्या विविध विषयांवर होणार चर्चा

    26-Jul-2024
Total Views |

VHP Baithak

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (VHP Baithak Jodhpur) 
विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय कार्यकारी समितीची दोन दिवसीय बैठक शनिवार, दि. २७ जुलैपासून जोधपूरमध्ये सुरू होत आहे. यानिमित्ताने शुक्रवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बैठकीची माहिती देताना विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री बजरंग बागड़ा म्हणाले की, बेकायदेशीर धर्मांतरण, मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्ती, लोकसंख्या असंतुलन, स्वयंरोजगार, स्वावलंबन, सेवा, समरसता, हिंदू निर्वासितांना नागरिकत्व देण्याच्या प्रगतीचा आढावा, कुंभाच्या तयारीसह महिला सक्षमीकरण, कौटुंबिक प्रबोधन आणि हिंदू मूल्यांवर सातत्याने होणारे हल्ले अशा अनेक मुद्यांवर बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

हे वाचलंत का? : लखनौचे बेकायदेशीर फूलमार्केट जमीनदोस्त! बुलडोझर बाबांची धडक कारवाई

पुढे ते म्हणाले, संघटनात्मक दृष्टीने तयार करण्यात आलेल्या सर्व ४५ प्रांतांतील विहिंप, बजरंग दल, दुर्गा वाहिनी आणि मातृशक्तीच्या सुमारे ३४० केंद्रीय, प्रांतीय आणि क्षेत्रीय पदाधिकारी बैठकीला अपेक्षित आहेत. राजस्थानमधील ऐतिहासिक जोधपूर शहरातील रातानाड़ा रोड येथील माहेश्वरी जन उपयोगी भवन येथे आयोजित या बैठकीत परदेशातील विहिंपचे सुमारे डझनभर पदाधिकारीही सहभागी होणार आहेत. आगामी श्रीकृष्ण जन्माष्टमीला विश्व हिंदू परिषदेचा ६० वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या निमित्त विहिंपच्या षष्टिपूर्ति समापन कार्यक्रमाचा कृती आराखडाही या बैठकीत निश्चित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.