मुंबईतील सायन पूल अखेर २ वर्षासाठी बंद!

    26-Jul-2024
Total Views |
Sion Railway Over Bridge
 
मुंबई : दक्षिण मुंबईसह पूर्व व पश्चिम उपनगरात ये-जा करण्यासाठी, विशेषत: वाहन चालकांसाठी महत्त्वपूर्ण असलेला सायन स्थानकातील ११० वर्षे जुना ब्रिटिशकालीन पूल १ ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद होणार आहे. वाहतूक प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी १ ऑगस्ट २०२४ ते जुलै २०२६ या कालावधीत हा पूल बंद राहणार असल्याचे सांगितले आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), मुंबईने त्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये या पुलाला धोकादायक घोषित केले होता. पंरतु बोर्डच्या परिक्षा, लोकसभा निवडणुक,स्थानिक रहिवाशांचा विरोध यामुळे पूल पाडण्याचा निर्णय लांबणीवर पडला. दरम्यान वावाहतूक बंद असल्याच्या कालावधीत होणाऱ्या कामांचे वेळापत्रक तयार केले असून लवकरच पूलाचे पाडकाम हाती घेण्यात येणार आहे. तसेच पूल तोडल्याच्या कालावधीत वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग सुचवला जाणार आहे. या पूलाच्या तोडण्याच्या आणि पुनर्बांधणीच्या कामाला तीन महिन्याचा कालावधी लागणार असून दोन वर्ष काम पूर्ण होण्यासाठी लागणार आहेत. या प्रकल्पासाठी ५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती मिळते.
 
हा असेल पर्यायी मार्ग

डॉ बाबासाहेब आंबेडकर रोडवरून सायन ओव्हर ब्रिजच्या पश्चिम आणि पूर्वेकडून एलबीएस मार्ग किंवा संत रोहिदास रोडकडे वाहने वळवली जातील. यात सायन-महिम लिंक रोड,के.के.कृष्णन मार्ग,सायन हॉस्पिटल जंकश्नजवळील सुलोचना शेट्टी रोडचा ही वापर केला जाऊ शकतो.