SNDT महिला विद्यापीठाच्या कुलगुरूंना मानद कर्नल पद प्रदान!

26 Jul 2024 17:33:48
 
Ujjwala Chakradev
 
मुंबई : SNDT महिला विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांना मानद कर्नल पद प्रदान करण्यात आले आहे. शुक्रवार, २६ जुलै रोजी हा सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मेजर जनरल विरेंदर सिंह, व्हीएसएम यांची उपस्थिती होती.
 
यावेळी बोलताना कुलगुरु प्रा. उज्वला चक्रदेव यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रातील प्रवासाबद्दल सांगितले. दरम्यान, त्यांनी या यशासाठी आपल्या कुटुंबियांचे आभार मानले. तसेच विद्यार्थी वर्गाला सशस्त्र दलांमध्ये जाण्याचे आवाहन केले. त्यांनी २५ व्या कारगिल विजय दिनाचा उल्लेख करत आजच्या युगातली एनसीसीची महत्वाची भूमिका अधोरेखित केली. यावेळी त्यांचे पती शिरीष चक्रदेव, मोठा मुलगा लेफ्टनंट कर्नल चैतन्य चक्रदेव आणि धाकटा मुलगा सनित चक्रदेव हेदेखील उपस्थित होते.
 
हे वाचलंत का? -  पुण्यातील पुरपरिस्थितीचा मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला आढावा! 'डीप क्लीन' मोहिम राबवण्याचे निर्देश
 
प्रमुख अतिथी मेजर जनरल विरेंदर सिंह यांनी आपल्या भाषणात प्रा. चक्रदेव यांच्या शिक्षण आणि एनसीसी क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले. त्यांनी तरुणींना एनसीसीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आणि मुलींना एनसीसीमधून देशसेवेची संधी असल्याचेही सांगितले. एनसीसी गाण आणि राष्ट्रगीताने हा कार्यक्रम संपन्न झाला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0