लखनौचे बेकायदेशीर फूलमार्केट जमीनदोस्त! बुलडोझर बाबांची धडक कारवाई

    26-Jul-2024
Total Views |

Lucknow Flower Market

मुंबई (प्रतिनिधी) : (Lucknow Flower Market)
उत्तर प्रदेश योगी सरकारने बुलडोझरची कारवाई करत गुरुवार, दि. २५ जुलै रोजी लखनऊ शहरात २००१ पासून उभारलेले बेकायदेशीर फूल मार्केट जमिनदोस्त केले आहे. फूल मार्केट ज्या जमिनीवर चालवले जात होते, ती जमीन हुसेनाबाद ट्रस्टची होती. ज्याने ही जमीन १०० वर्षांच्या लीजवर दिली होती. भाडेपट्टी राज्याने २०२४ मध्ये लीज रद्द केली आणि दुकानदारांना जागा रिकामी करण्याचे आदेश दिले. मात्र त्यानंतर कुठल्याही हालचाली न झाल्याने राज्य प्रशासनाने बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केल्याचे दिसत आहे.

हे वाचलंत का? : गो-तस्करांवर पोलिसांची मोठी कारवाई; उत्तराखंडात लपून बसलेल्या आरोपींना ठोकल्या बेड्या!

राज्याने राबविलेल्या या बुलडोझरच्या कारवाईमुळे या विशिष्ट फूलमार्केटमधील शेतकरी प्रभावित झाले आहेत. फुलबाजारात दररोज दोन ते तीन लाख रुपयांचा व्यवहार होत असल्याचे मानले जाते. सण-उत्सव किंवा लग्नसराईच्या काळात तर या बाजारात दररोज १० लाख रुपयांचा व्यापार होत असे.

जिल्हाधिकाऱ्यांनी २०२२ मध्ये फुलबाजाराचे भाडेपट्टे संपुष्टात आणण्याचे आणि अतिक्रमण काढण्याचे पत्र दिले. पुढे, २०२३ मध्ये, ट्रस्टने शेतकऱ्यांना जमीन रिकामी करण्यास सांगितले. सन २०२४ मध्ये हुसेनाबाद ट्रस्टचा भाडेपट्टा रद्द करण्यात आला आणि शेतकऱ्यांना जमीन रिकामी करण्यासाठी पुन्हा नोटीस बजावण्यात आली. शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले. तथापि, राज्याने लखनौमधील बेकायदेशीर बांधकाम पाडण्यासाठी बुलडोझरची कारवाई केली. स्थानिक वृत्तानुसार गोमती नगर भागातील फूलबाजार आता 'किसान बाजार'मध्ये हलवण्यात आला आहे.