कमला हॅरिस यांची उमेदवारी निश्चित? ओबामा दांपत्याने दिला पाठिंबा

    26-Jul-2024
Total Views |
 Kamala Harris Obama couple
 
वॉशिंग्टन डी.सी : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी शुक्रवार, दि. २६ जुलै २०२४ कमला हॅरिस यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. सोशल मिडियावर एक व्हिडिओ जारी करून या दोघांनी कमला हॅरिस यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी कमला हॅरिस यांच्यासोबत झालेल्या फोन कॉलचा देखील उल्लेख केला.
 
ओबामा यांनी हॅरिसला सांगितले की, "मिशेल आणि मी तुम्हाला हे सांगण्यासाठी फोन केला आहे की तुम्हाला पाठिंबा देताना आम्हाला अभिमान वाटत आहे, तुम्हाला ही निवडणूक जिंकण्यासाठी आणि तुम्हाला ओव्हल ऑफिसमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व काही करू शकतो." माजी फर्स्ट लेडीने हॅरिसला सांगितले की, मला तुझा अभिमान आहे. हे ऐतिहासिक ठरणार आहे. फोनवर बोलताना हॅरिसने पाठिंब्या बद्दल ओबाम दापत्यांचे आभार मानले.