मनोरंजन आणि प्रबोधन करणारा ‘हेचि दान देगा देवा’

    26-Jul-2024
Total Views |
हेचि दान देगा देवा
 आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने सोलापूर येथील हुतात्मा मंदिर चौक येथे १६ जुलै रोजी ‘हेचि दान देगा देवा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
राज्य सांस्कृतिक पुरस्कार विजेत्या व प्रवचनकार श्रीमती प्राची गडकरी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सुप्रसिद्ध गायक व राज्य सांस्कृतिक पुरस्कार विजेते श्री कल्याण गायकवाड, विदुषी गायिका बकुळ पंडित आणि उद्योन्मुख गायिका श्रीमती प्राजक्ता काकतकर देशक यांच्या गायनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. युवा भारूडकार कृष्णाई उळेकर यांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांचे मनोरंजनासोबतच प्रबोधनही झाले.
हा कार्यक्रम विनामूल्य होता. रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी केले होते. या कार्यक्रमाचे समन्वयक आर्यन देसाई होते.