निर्माते शेखर कपूर यांची IFFIच्या अध्यक्षपदी निवड

    26-Jul-2024
Total Views |

iffi 
 
 
मुंबई : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी सोहळा लवकरच रंगणार असून या चित्रपटसोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ चित्रपट निर्माते शेखर कपूर यांची निवड करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी गोव्यामध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ५५व्या आणि ५६व्या आवृत्तीसाठी कपूर महोत्सव प्रमुख असणार आहेत.
 
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केललेया या अधिसूचनेत असे नमूद करण्यात आले आहे की, 'सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने, गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ५५व्या आणि ५६ व्या आवृत्तीसाठी शेखर कपूर यांची महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे'. कपूर यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत याविषयी आनंद व्यक्त केला. हा एक सन्मान असल्याचे ते म्हणाले आहेत.
 
 
 
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची पोस्ट शेअर करत शेखर कपूर यांनी लिहिले आहे की, 'हा एक सन्मान आहे. ही एक वचनबद्धता आहे. ही एक जबाबदारी आहे. मला तुमच्या विश्वासासाठी पात्र समजल्याबद्दल धन्यवाद'.