कॉरिओग्राफर फराह खानला मातृशोक! कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर

26 Jul 2024 17:28:54

Farah Khan 
 
 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शिका फराह खान आणि दिग्दर्शक साजीद खान यांच्या आईचं निधन आहे. त्यांच्या आईचे नाव मेनका असं होतं. मेनका या बालकलाकार हनी इराणी आणि डेसी इराणी यांच्या बहिण होत्या. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
 
दरम्यान, १२ जुलै रोजी त्यांच्या आईचा वाढदिवस होता आणि त्यासाठी फराह यांनी विशेष पोस्ट लिहिली होती. त्यात लिहिलं होतं की, "आपण कायमच आपल्या आईला गृहीत धरत आलोय. विशेषतः मी जास्तच गृहीत धरलंय. मला गेल्या महिन्यात जाणीव झाली की माझी आई मेनकावर माझं किती प्रेम आहे. ती खूप स्ट्रॉंग आहे. याशिवाय तिच्याइतकी हुशार व्यक्ती मी दुसरीकडे कुठे पाहिली नाही. अनेक सर्जरी होऊनही तिच्यातली विनोदबुद्धी कायम राहिली. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई." अशा शब्दात फराहने आईला शुभेच्छा दिल्या होत्या.
 

Farah Khan 
 
फराह खान यांच्या आईच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतील त्यांच्या मित्र परिवानाने श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच, त्यांच्या कुटुंबाला आधार देणाऱ्या पोस्टही सोशल मिडियावर करण्यात आल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0