"लाडक्या बहिणींनो सावत्र भावांपासून सावध रहा!"

    26-Jul-2024
Total Views |
 
Eknath Shinde
 
मुंबई : लाडक्या बहिणींनो सावत्र भावांपासून सावध रहा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले आहे. लाडकी बहिण योजनेवर वित्त विभागाने चिंता व्यक्त केली होती. यावर मुख्यमंत्री शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "राज्य सरकार म्हणून ज्या योजना आम्ही जाहीर केल्या आहेत त्या सर्व योजनांसाठी आम्ही पैशांची तरतूद केलेली आहे. त्यामुळे कोणता अधिकारी काय बोलतो याबद्दल आम्ही माहिती घेऊच, परंतू, सरकार म्हणून ही जबाबदारी आमची आहे."
 
हे वाचलंत का? -  SNDT महिला विद्यापीठाच्या कुलगुरूंना मानद कर्नल पद प्रदान!
 
"ज्यादिवशी आम्ही लाडकी बहीण योजना सुरु केली त्याचदिवशी सावत्र भावांच्या पोटात दुखू लागलं आणि काय करावं हे त्यांना कळेनासं झालं. त्यानंतर त्यांनी लाडक्या भावांचं काय? असा प्रश्न उपस्थित केला. तर आम्ही लाडक्या भावांसाठीही योजना सुरु केली. हे सगळं त्यांच्यासाठी अनपेक्षित आहे. सरकार शेतकऱ्यांना कसं काय वीजबिल माफ करतं हे त्यांच्या पचनी पडत नाही. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तसेच या योजनेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे त्यांना आपल्या डोळ्यासमोर पराभव दिसू लागला आहे. म्हणून ते योजनेलाच विरोध करत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनी सावत्र भावांपासू सावधान राहावं. ते तुमच्या योजनांच्या विरोधात आहेत. लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ नक्की विरोधकांना उत्तर देतील. लाडक्या मुलापेक्षा लाडकी बहीण आणि भाऊ केव्हाही चांगले असतात," असा खोचक टोलाही मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना लगावला आहे.