‘धर्मवीर -२’ च्या निर्मात्यांनी घेतला उल्लेखनीय निर्णय

    26-Jul-2024
Total Views |

dharmaveer 2 
 
 
मुंबई : गेले काही दिवस राज्यभरात मुसळगार पाऊस पडत असल्यामुळे महाराष्ट्रात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि याचमुळे बहुचर्चित ‘धर्मवीर – २’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. ९ ऑगस्टला प्रदर्शित होणारा ‘धर्मवीर – २’ चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र राज्यात होत असलेली अतिवृष्टी, त्यामुळे ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.
 
चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई म्हणाले की, “गेल्या काही दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्रात पूर जन्य परिस्थिती निर्माण झाली आहेत, काही गाव पाण्याखाली गेली असून काही गावांचा संपर्कही तुटला आहे. राज्यात सुरु असलेली ही पूरपरिस्थिती पाहता "धर्मवीर - २" हा चित्रपट ९ ऑगस्टला प्रदर्शित करणे योग्य वाटत नाही. महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यांत पाणी असताना, त्यांच्यासमोर असलेल्या अडचणी असताना त्याच काळात चित्रपट प्रदर्शित करण्यापेक्षा परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करू”.
 
दरम्यान, नुकताच या चित्रपटाचा भव्य ट्रेलर अनावरण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला होता. प्रवीण तरडे दिग्दर्शित, लिखित या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक याने धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे.