मुंबई (प्रतिनिधी) : (Vishalgad Viral Video News) विशाळगडावर नोटांची बंडले वाटल्याचा ‘व्हिडिओ’ नुकताच प्रसारित झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे पैसे ‘हैदराबाद युथ करेज’ नावाच्या गटाने वाटल्याचा आरोप हिंदु जनजागृती समितीकडून करण्यात येत आहे. हा पैसा या गटाला कुठून उपलब्ध झाला? हे पैसे वाटून त्यांना काय साध्य करायचे आहे? हे समोर आणण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, या मागणीचे मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन पत्र हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हुपरी पोलीस ठाण्यात साहाय्यक पोलीस निरीक्षक एन्.आर्. चौखंडे यांना देण्यात आले आहे.
हे वाचलंत का? : विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक वाचू न दिल्याने मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल!
विशाळगडावर १४ जुलैला जो उद्रेक झाला, त्याला पूर्णतः प्रशासन उत्तरदायी आहे. ही घटना प्रशासनाच्या बोटचेप्या आणि अन्यायकारक भूमिकेमुळेच घडली आहे. त्यामुळे या प्रकरणी कारवाई केलेल्या सर्व हिंदूंवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अशी मागणीही या प्रसंगी करण्यात आली आहे.