"नदीत आंघोळ करायला आलात तर गोळ्या घालू"; हिंदू भाविकांना पाकिस्तानी लष्कराची धमकी

    25-Jul-2024
Total Views |

Sharada Temple News

मुंबई (प्रतिनिधी) : (Sharada Temple News) 
उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील टिटवाल येथील ७५ वर्षांच्या संघर्षानंतर उघडलेल्या शारदा मातेच्या मंदिरात पूजा करताना हिंदूंनी किशनगंगा नदीत स्नान करू नये, असे केल्यास गोळ्या घालण्यात येतील. असा इशारा पाकिस्तान लष्कराकडून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

हे वाचलंत का? : "मांस हलाल आहे की झटका, हे दुकानाबाहेर लिहा"; प्रशासनाचे आदेश

मिळालेल्या माहितीनुसार किशनगंगा नदीच्या पलीकडे पाकव्याप्त काश्मीर असल्याने येथील पाक सैनिक लाऊडस्पीकरद्वारे भाविकांना सतत धमकावत आहेत. वास्तविक हे मंदिर गेल्यावर्षी ५ जून रोजी उघडण्यात आले. १९४७ पूर्वी शारदा पीठात जाण्यासाठी येथे बेस कॅम्प होता. हिंदू आणि शीख धर्मियांसाठी येथे धर्मशाळा होती. येथूनच आता पीओकेमध्ये असलेल्या शारदा पीठात यात्रेकरू जात असत. १९४७ नंतर जेव्हा लोकांनी मंदिरात जाणे बंद केले तेव्हा येथील सर्व वास्तूही जीर्णावस्थेत पडल्या. सध्या भारतीय लष्कराने हे प्रकरण स्वतःच्या हातात घेतल्याची माहिती आहे.