मुंबई (प्रतिनिधी) : (Sanskrut Shlok News) मध्य प्रदेशच्या गुना जिल्ह्यातील वंदना कॉन्व्हेंट शाळेच्या मुख्याध्यापिकेविरोधात सहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक म्हणण्यापासून रोखल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते सक्षम दुबे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदविल्याची माहिती मिळत आहे.
हे वाचलंत का?: गोहत्येच्या आरोपाखाली तीन ख्रिश्चनांना अटक; १६० किलो गोमांस जप्त!
सकाळच्या सत्रात विद्यार्थी ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ हा संस्कृत श्लोक पाठ करण्याचा प्रयत्न करत असताना शाळेच्या मुख्याध्यापिका कॅथरीन नाराज झाल्या आणि त्यांनी मुलांकडून मायक्रोफोन हिसकावून घेतला. नंतर त्यांनी कोणीही हे मंत्र पाठ करणार नाही-हिंदी बोलणार नाहीत केवळ इंग्रजी बोलण्यावरच भर देतील, असे विधान केले. त्यामुळे अभाविपच्या कार्यकर्त्यांनी वंदना कॉन्व्हेंट स्कूलमध्ये निदर्शने केली. जिल्हा शिक्षणाधिकारी चंद्रशेखर सिसोदिया यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना नोटीस बजावली असून त्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मिटवण्यात आले.