लव्ह जिहाद! ३३ वर्षीय दिलशादने केले अल्पवयीन मुलीचे अपहरण

    25-Jul-2024
Total Views |
 Bareily Love JIhad
 
लखनौ : बरेली येथील वीटभट्टीवर मजुरी करणाऱ्या ३३ वर्षीय दिलशाद अलीने परसरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हिंदू तरुणीला आपल्या जाळ्यात अडकवले. दि. ६ जुलै रोजी ती महाविद्यालयात जात असताना त्याने तिचे अपहरण केले आणि तिला बरेली जिल्ह्यातील बिथरी येथे आणले. एकीकडे बस्तीमध्ये विद्यार्थिनीचे पालक मुलीचा शोध घेत आहेत, तिला परत आणण्यासाठी पोलिसांकडे विनवणी करत आहेत, तर दुसरीकडे बरेलीच्या बिथरीमध्ये दिलशाद अलीने हिंदू मुलगी आपल्या घरात असल्याचे उघडपणे जाहीर केले आहे.
 
हिंदू मुलीचे धर्मांतर करून तिच्याशी लग्न करणार असल्याचे दिलशादने जाहीर केले आहे. इतकेच नाही तर दिलशाद अलीने बरेली एसडीएम कोर्टात लग्नाचा अर्जही दाखल केला आहे. दरम्यान, हिंदू संघटनांना याची माहिती मिळताच त्यांनी प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निसार अलीचा मुलगा दिलशाद अली हा बरेलीमधील बिथरी गावचा रहिवासी आहे.
  
बस्ती जिल्ह्यातील परशुराम पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या वीटभट्टीवर तो मजूर म्हणून काम करत असे. ही विद्यार्थिनी परसरामपूर परिसरातील टक्कीपूर खेकरी येथील रहिवासी असून तिचे पालक शेतकरी आहेत. दिलशाद अली याने विद्यार्थिनीला सापळा रचून दि. ६ जुलै रोजी तिचे अपहरण करून बरेली येथे आणले. आता तिने एसडीएम कोर्टात लग्नाच्या मंजुरीसाठी अर्जही दाखल केला आहे. या संदर्भात विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरात लवकर विद्यार्थीनीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बस्ती पोलिसांनी सांगितले.