केजरीवालांचा तुरुंगातील मुक्काम वाढला; दिलासा देण्यास कोर्टाचा नकार

    25-Jul-2024
Total Views |
 kejriwal
 
नवी दिल्ली : दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी राऊस एव्हेन्यू न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. सुनावणीच्या वेळी ते तिहार तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. यापूर्वी १२ जुलै रोजी न्यायालयाने मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सीबीआय न्यायालयीन कोठडीत २५ जुलैपर्यंत वाढ केली होती.
 
दि. १२ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. जामीन मंजूर करताना न्यायमूर्ती संजीव खन्ना म्हणाले होते की, केजरीवाल ९० दिवसांपासून तुरुंगात आहेत. त्यामुळे त्यांना जामीन देण्यात येत आहे. आम्हाला माहित आहे की ते निवडून आलेले नेते आहेत आणि त्यांना मुख्यमंत्री राहायचे की नाही हे त्यांनी ठरवायचे आहे, असेही न्यायालयाने सांगितले होते.
  
सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर केजरीवाल तुरुंगातून बाहेर येण्याच्याआधीच त्यांना सीबीआयने अटक केली होती. त्यानंतर राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने त्याला कोठडी सुनावली. त्याच्याविरुद्धचा दुसरा खटला सीबीआयचा आहे.