मगर हम चुप रहेंगे!

25 Jul 2024 20:56:53
Blue Mosque ban of izh

 
दर शुक्रवारी फतव्यानुसार आपल्याइथेही खूप काही घडत असते. या पार्श्वभूमीवर जर्मनीमध्ये नुकतेच सहाव्या शतकातल्या इमाम अली मशीद (ब्लू मशीद) सह इतर तीन मशिदींना टाळे ठोकले गेले. या मशिदींमध्ये जर्मनीत ‘कट्टर इस्लाम’चा प्रसार करण्याचे षड्यंत्र रचले जात होते, असे जर्मनी सरकारचे म्हणणे आहे.
 
जर्मनी पोलिसांनी शिया इस्लामी संघटनेवर कारवाई करताना देशातील 50 जागांवर छापेमारी केली. तसेच ’इस्लामिक सेंटर हॅम्बर्ग’ (IZH)या संघटनेवरही बंदी आणली. जर्मन अधिकार्‍यांच्या मते, ‘इस्लामिक सेंटर हॅम्बर्ग’ हे संघटनच्या ‘प्रॉक्सी ग्रुप हिजबुल्ला’ या दहशतवादी संघटनेशी जोडलेले आहे. जर्मनीमध्ये 2020 सालीच ‘हिजबुल्ला’ या दहशतवादी संघटनेवर बंदी घातली गेली. तसेच या संघटनेशी संबंध असलेल्या लोकांवरही प्रतिबंध लादले. ’इस्लामिक सेंटर हॅम्बर्ग’वर आरोप आहे की, जर्मनीमध्ये ‘रॅडिकल इस्लाम’ म्हणजेच कट्टरता वाढवण्यासाठी हे संघटन काम करते. इस्लामविरोधात ख्रिस्ती तसेच ज्यू समुदायांविरोधात चिथावणी देण्याचे कामही ही संघटना करते.

जर्मनीमध्ये थेट मशिदींना टाळे ठोकण्याची वेळ का आली असेल? देशभरातून मूळचे जर्मन असलेल्या नागरिकांमध्ये मुस्लीमविरोधी भावना आहे, असे जर्मनीत राहणार्‍या बहुसंख्य मुस्लिमांचे म्हणणे. या अनुषंगाने जर्मनीतले मूळ नागरिक आणि विस्थापन किंवा शिक्षण, रोजगारामुळे जर्मनीमध्ये स्थायिक झालेल्या मुस्लिमांचे सर्वेक्षण करण्यात आले. जर्मनीच्या प्रसिद्ध ‘बेर्टेल्समान प्रतिष्ठान’ने जर्मन नागरिकांचे सर्वेक्षण केले. विषय होता, “इस्लामबद्दल काय वाटते?” सर्वेक्षणातून समोर आले की, 50 टक्के जर्मन नागरिकांच्या मते ते इस्लामला एक धोका म्हणूनच पाहतात, तर 15 टक्के लोकांनी सांगितले की, ’इतर कोणत्याही धर्मांपेक्षा त्यांना इस्लामची जास्त भीती वाटते,’ तर, 75 टक्के लोकांनी म्हटले की ’इस्लाम प्रगतिशील नाही.

महिलांचा शत्रू आणि दहशतवादाचे समर्थन करणारा आहे.’ दुसरीकडे, जर्मनीच्या ‘लोअर सॅक्सोनी क्रिमिनल रिसर्च इन्स्टिट्यूट’नेही जर्मनीतील मुस्लीम विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात 67.8 टक्के विद्यार्थ्यांच्या मते, ‘कुराण’ हे जर्मनीतील कायद्यापेक्षा श्रेष्ठ आणि महत्त्वपूर्ण आहे; तर 45.6 टक्के विद्यार्थ्यांच्या मते, जर्मनीतील सरकारने इस्लामिक धर्मतंत्रानुसार चालावे. तेच सगळ्यात चांगले स्वरूप आहे. जर्मनीने सर्वच स्तरांवर इस्लाम स्वीकारावा.

असो. गेल्या महिन्यात एक घटना घडली. जगभरात इस्लामच्या नावाने दहशतवादी संघटना जे काही करतात, त्याविरोधात जर्मनीमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जर्मनीतील ‘इस्लामविरोधी नेता’ म्हणून ओळख असलेले मायकल स्टर्जनबर्गर या कार्यक्रमाचे नेतृत्व करत होते. मायकल स्टर्जनबर्गर हे त्यांच्या इस्लामविरोधी वक्तव्यामुळे प्रसिद्ध आहेत. एकदा ते म्हणाले होते, ”2008 साली मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यामध्ये त्यांचे सहयोगी राल्फ बर्कई मारले गेले होते. ती पहिली वेळ होती, ज्यावेळी त्यांच्या मनात इस्लामिक कट्टरपंथींविरोधात घृणा निर्माण झाली.” तर, असे हे स्टर्जनबर्गर जर्मनीमध्ये त्या कार्यक्रमाचे नेतृत्व करत होते. मात्र, अचानक एक चाकूधारी इसम आला आणि त्याने कार्यक्रमाला उपस्थित लोकांवर चाकूने हल्ला केला. स्टर्जनबर्गर यांच्यावरही हल्ला केला. यामुळे जर्मनीमधले वातावरण ढवळून निघाले. जर्मनीच्या लोकांचे म्हणणे की, केवळ सहा टक्के असताना जर्मनीमध्ये ही अशी परिस्थिती आहे, तर पुढे काय होणार? त्यामुळे जर्मन प्रशासन देशात इस्लामिक कट्टरता वाढू नये, यासाठी प्रयत्नशील आहे.

जर्मनीमध्ये मुस्लिमांच्या धार्मिक प्रशिक्षणासाठी तुर्कीहून मौलवी येतात. जर्मन प्रशासनाने जाहीर केले की, ’आमच्या देशात आमची संस्कृती, आमचा इतिहास आणि आमचे भवितव्य जपणारे मौलवी हवेत.’ त्यामुळे तुर्कीहून मौलवी आयात करण्यापेक्षा देशातच मौलवींना प्रशिक्षण दिले जाईल. या पार्श्वभूमीवर जर्मन नागरिक काय विचार करतात? तर, तेथील नागरिकांचे एकमताने म्हणणे आहे की, त्यांना भीती वाटते की, काही काळाने तेच त्यांच्या जर्मनीमध्य अल्पसंख्याक होतील. पण, अशी भीती वाटणारे जर्मनी पहिले किंवा एकमेव राष्ट्र आहे का? या परिक्षेपात भारताची परिस्थिती काय? तर ‘जर्मनी सुपात आहे आणि भारत जात्यात’ इतकेच. मगर फिर भी हम चुप रहेंगे...

9594969638
Powered By Sangraha 9.0