गोहत्येच्या आरोपाखाली तीन ख्रिश्चनांना अटक; १६० किलो गोमांस जप्त!

    25-Jul-2024
Total Views |

Beef Seized in Punjab

मुंबई (प्रतिनिधी) : (Beef Seized in Punjab)
अमृतसर येथील राहत्या घरात गायींची कत्तल करून मांस विक्री केल्याप्रकरणी तीन ख्रिश्चनांना अटक करण्यात आली आहे. रामदास पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दयाल भाटी गावात ही घटना घडली असून आरोपींकडून मोठ्या प्रमाणात गोमांस जप्त करण्यात आले. निशान मसिह, अजय मसिह आणि सॅम्युअल मसिह अशी या तीन आरोपींची नावे आहेत.

हे वाचलंत का? : लव्ह जिहाद! ३३ वर्षीय दिलशादने केले अल्पवयीन मुलीचे अपहरण

रामदास पोलिस स्टेशनचे एसआय नरेश कुमार यांनी आपल्या टीमच्या सहाय्याने केलेल्या छापेमारीत सुमारे १६० किलो गोमांस, गायीचे कातडे आणि शरीराच्या इतर अवयवांसह जप्त केले आहेत. आरोपींवर बीएनएस कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार या तिघांवर अतिरिक्त कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सूचित केले.