मुंबई : बच्चू कडू मनोज जरांगेंसोबत तिसऱ्या आघाडीत लढणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. यावर आता बच्चू कडूंनी स्पष्टीकरण दिलं आहे. जरांगेंसोबत निवडणूक लढवण्याबाबत अजून कोणतीही चर्चा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला.
बच्चू कडू म्हणाले की, "तिसरी आघाडी हा आमचा विषय नाही. पण शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकऱ्यांची एक आघाडी करून आम्ही हा लढा लढणार आहोत. मनोज जरांगेंसोबत निवडणूक लढवण्याबाबत अजून कोणतीही चर्चा नाही. येत्या ९ तारखेला संभांजीनगरमध्ये आमचा एक मोर्चा आहे. तो झाल्यावर आम्ही सर्वांना निवेदन देऊ आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु. त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्हीच वेगळं लढणार नाही."
हे वाचलंत का? - राज ठाकरेंनी फुंकले विधानसभेचे रणशिंग! 'इतक्या' जागा लढवणार
संभाजीनगरच्या मोर्चानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करु. आमच्याकडे सध्या विधानसभेसाठी २० ते २२ नावं आलेली आहेत. हळूहळू ती वाढेल. आम्हाला जागांपेक्षा मुद्दे महत्वाचे असून ते घेऊनच आम्ही लढणार आहोत," असेही बच्चू कडू यांनी सांगितले आहे.