आसियान देशांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी एस.जयशंकर लाओस दौऱ्यावर; काय आहे अजेंडा?

25 Jul 2024 18:00:58
 jayashakar
 
वियनतियाने : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आसियान बैठकीसाठी गुरुवार, दि. २५ जुलै २०२४ लाओसची राजधानी वियनतियाने येथे पोहोचले आहेत. यादरम्यान, ते म्हणाले की दक्षिण पूर्व राष्ट्रांच्या संघटनेशी संबंध अधिक दृढ करण्यासाठी ते उत्सुक आहेत. जयशंकर म्हणाले की, भारत आपल्या 'ॲक्ट ईस्ट पॉलिसी'ला १० वर्षे पूर्ण करत आहे.
 
जयशंकर यांना लाओसचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री सेलमक्से कोमासिथ यांनी आसियान-भारत, पूर्व आशिया शिखर परिषद (EAS) आणि आसियान रीजनल फोरम (ARF) या स्वरूपातील आसियान फ्रेमवर्क अंतर्गत परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते.
  
"मी आसियान बैठकीसाठी लाओसमधील वियनतियाने येथे आलो आहे. आम्ही ऍक्ट ईस्ट पॉलिसीचे एक दशक पूर्ण करत असताना आसियानसोबतचे भारताचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत," असे परराष्ट्र मंत्र्यांनी ट्विट केले. जयशंकर हे आसियान परिषदेच्या पार्श्वभूमीवर वियनतियानेमध्ये इतर देशांतील समकक्षांशी द्विपक्षीय चर्चा करण्याची शक्यता आहे.
 
Powered By Sangraha 9.0