महाराष्ट्राला केंद्राकडून रेल्वे प्रकल्पांसाठी 15 हजार, 900 कोटींचे बुस्टर : अश्विनी वैष्णव

    25-Jul-2024
Total Views |

Ashwini Vaishnv
 
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी विक्रमी म्हणजेच 13.5 टक्क्यांनी निधी तरतुदीत वाढ झाल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते बुधवार, दि. 24 जुलै रोजी ‘अर्थसंकल्प 2024’ संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस सरकारच्या काळात महाराष्ट्राला रेल्वे प्रकल्पांसाठी केवळ 1 हजार, 100 कोटी इतकाच निधी दिला जात होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात या निधीत भरीव वाढ करण्यात आली.
 
ही वाढ दरवर्षी वाढत यंदाच्या वर्षी ही वाढ 13.5 टक्के इतकी वाढली आहे. यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 15 हजार, 940 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. इतकेच नाही, तर राज्यात आलेल्या फडणवीस-शिंदे सरकारमुळे रेल्वे प्रकल्पनासमोरील आव्हाने कमी झाली असून प्रकल्पांना गती आहे. महाराष्ट्रात नवीन ट्रकनिर्मितीचा वेग हा 180 किमी प्रतिवर्षं इतका आहे. तर 128 स्थानिकांच्या पुनर्विकासची कामे प्रगतीपथावर आहेत.
 
प्रकल्प आणि निधीनवीन मार्गिका, दुहेरीकरण, मार्गिकाविस्तार यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. नवीन स्थानके, समर्पित मालवाहतूक मार्गिका, गतीशक्ती कार्गो मल्टिमॉडेल टर्मिनल प्रकल्प, मेगा टर्मिनल यांसारख्या महाराष्ट्रातील प्रकल्पांसाठी 1 लाख, 30 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रातील प्रकल्पांना गती मिळत आहे. महाराष्ट्रातील सर्व रेल्वेमार्गिकांचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. 100 टक्के रेल्वेमार्गिकाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे.
 
दोन लोकलमधील मध्यांतर कमी होणार
 रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले की, “नवीन तंत्रज्ञानावर (कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सिस्टिम) काम सुरू आहे. हे तंत्रज्ञान मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. हे तंत्रज्ञान आल्याने गाड्यांमधील अंतर कमी होणार आहे.
म्हणजेच मध्यांतर जे आता 180 सेकंद होते, ते 150 सेकंद इतके असेल. म्हणजेच ते 30 सेकंद वाचवेल.”
 
बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 30 हजार कोटी
“मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पासाठी 30 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे,” असेे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. “या प्रकल्पाला दोन्ही राज्य सरकारे मदत करत आहेत. 508 किमी लांबीचा बुलेट प्रकल्प आगामी काळात प्रकल्पातील शहरांचा विकास दुप्पट करेल. सध्या व्हायाडक्टचे काम सुरू असून ते खूपच आव्हानात्मक आहे,” असे रेल्वेमंत्री म्हणाले.
 
छशिमट-पनवेल
कॉरिडॉर 1,391 कोटी
 
छशिमट-कल्याण
कॉरिडॉर 2,166 कोटी
 
चर्चगेट-विरार
कॉरिडॉर 2,371 कोटी