युध्दात सहभागी होण्यासाठी राष्ट्राध्यक्षांकडून पैशांची खैरात; बोनसरुपी इतकी रक्क्म!

24 Jul 2024 17:12:25
russia ukraine war bonus citizens
 

नवी दिल्ली :      रशिया-युक्रेन यांच्यात गेल्या दोन वर्षापासून संघर्ष सुरू असून रशियाकडून आता नागरिकांना युध्दात सहभागी होण्याकरिता प्रयत्न केले जात आहेत. या संघर्षात गेल्या दोन वर्षात अनेक लोकांचे प्राण गेले आहेत. तसेच, दोन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या युद्धात दोन्ही बाजूंनी अनेक जीवितहानी झाली आहे. परंतु, युक्रेनमधील संघर्ष महासत्तेला अनेक पटीने महाग पडेल असे दिसते आहे.

दरम्यान, रशिया-युक्रेन संघर्षात रशियाकडून मोठे पाऊल उचलले जात आहे. रशियाने आता त्यांच्या सैन्याची संख्या वाढविण्याकरिता हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे मॉस्को येथील अधिकारी युक्रेनमध्ये लढण्यासाठी नवीन भरतीसाठी रेकॉर्ड साइन-ऑन बोनस ऑफर करत आहेत, अशी माहिती सीएनएनच्या अहवालातून समोर आली आहे.


हे वाचलंत का? -     अर्थसंकल्पानंतरच्या पहिल्याच दिवशी इंधनांच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर


मॉस्कोचे महापौर सेर्गेई सोब्यानिन यांनी लष्करात भरती झालेल्या स्थानिकांसाठी तब्बल १२ लाख रुपये युध्दाकरिता एक-वेळ स्वाक्षरी बोनस जाहीर केला आहे. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी नागरिकांना युद्धात सामील होण्यासाठी मोठी रक्कम बोनस म्हणून दिल्याची माहिती समोर आली आहे.

युक्रेनियन सैन्याविरुद्धच्या तीव्र लढाईत रशियन सैन्य मारले जात आहे. याच पार्श्वभूमीवर युध्दात गंभीर जखमी झाल्याचे दाखविणारे ड्रोन फुटेज सोशल मीडियावर प्रसारित झाले आहेत. यात युक्रेनियन सैनिकांनी रशियन सैन्याकडून जबरदस्त हल्ल्यांना तोंड द्यावे लागल्याचे दिसून येत आहे. यात कमांडरद्वारे खर्च करण्यायोग्य संसाधने वापरली जात आहेत, असे अहवालात नमूद केले आहे.




Powered By Sangraha 9.0