१० व्या विज्ञान एकांकिका स्पर्धेचे आयोजन

    24-Jul-2024
Total Views |

विज्ञान एकांकिका स्पर्धा  
मराठी विज्ञान परिषदेतर्फे राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे दहावे वर्ष आहे. शैक्षणिक गट (इयत्ता सातवी ते दहावी) आणि खुला गट(वरिष्ठ महाविद्यालय आणि नाट्य संस्था) अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धकांना विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कोणत्याही विषयावर आधारित एकांकिका सादर करता येणार आहे. स्पर्धेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट आहे.स्पर्धा प्राथमिक आणि अंतिम अशा दोन फेऱ्यांमध्ये होणार आहे.
 
प्राथमिक फेरीतील विभागांनुसार प्रत्येक विभागातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे तीन क्रमांक काढले जातील. प्रत्येक विभागातून पहिल्या क्रमांकाच्या एकांकिकेची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात येईल.अंतिम फेरी नोव्हेंबर महिन्याच्यात मुंबईत प्रत्यक्ष रंगमंचावरील सादरीकरणाद्वारे होईल.प्राथमिक व अंतिम फेरीत सादरीकरणात सहभागी होणाऱ्या सर्व संस्थांना, कलाकारांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.स्पर्धेची तपशीलवार माहिती मराठी विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.