(Rakesh Tikait Premanand Maharaj)
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी वृंदावन येथे प्रेमानंद महाराजांची भेट घेतल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर धुमाकुळ घालत आहे. "शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहुन त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवणे हे निश्चितच उत्तम कार्य आहे, मात्र यात स्वार्थ असता कामा नये.", असे म्हणत प्रेमानंद महाराजांनी राकेश टिकैत यांचे कान टोचत त्यांना आरसा दाखवल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.