हनुमान मंदिरासमोर कट्टरपंथीयांकडून 'सिर तन से जुदा'च्या घोषणा; ४० जणांविरोधात गुन्हा दाखल

    24-Jul-2024
Total Views |

Muharram Hanuman Mandir

मुंबई (प्रतिनिधी) : (Muharram Hamunam Mandir)
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये मोहरमच्या मिरवणुकीत कट्टरपंथीयांकडून 'सिर तन से जुदा'चे घोषणा दिल्याचे निदर्शास आले आहे. रावतपूरच्या हनुमान मंदिरासमोरून जानाता अशा घोषणा देत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न या कट्टरपंथीयांकडून झाला आहे. याप्रकरणी कानपूर पोलिसांनी ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हे वाचलंत का? : जलाभिषेक करून परतणाऱ्या कंवरियांवर धर्मांधांचा हल्ला!



ही घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहे. एक व्हायरल व्हिडिओमध्ये ज्यात हिंदू मंदिराबाहेर मुस्लिम जमाव 'सिर तन से जुदा'च्या घोषणा देत असल्याचे दिसते आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर पोलिसांनी व्हिडिओची चौकशी करत असून त्यानुसार कारवाई केली जाईल, असे सांगितले होते. या प्रकरणाचा तपास कल्याणपूरचे एसीपी अभिषेक कुमार पांडे यांच्याकडे सोपवण्यात आला असून आता पोलिसांनी ४० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी कानपूरच्या जुही पोलीस स्टेशन परिसरात अशीच एक घटना घडली होती. मोहरम मिरवणुकीत सहभागी झालेल्या अनेकांनी ‘हिंदुस्थानात रहायचं असेल तर अल्लाहु अकबर म्हणावं लागेल’ अशा घोषणा दिल्या होत्या.