मुंशी प्रेमचंद यांच्या नाटकांवर आधारित ‘प्रेम उत्सव’

    24-Jul-2024
Total Views |
PREMCHAND
आयडिया ग्रुपतर्फे सुप्रसिद्ध लेखक मुंशी प्रेमचंद यांच्या नाटकांवर आधारित ‘प्रेम उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवामध्ये मुंशी प्रेमचंद यांची २२ भाषांमधील नाटके सादर होणार आहेत. ३१ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत माटुंगा येथील म्हैसूर असोसिएशन सभागृहात रोज दुपारी ४ वाजल्यापासून हा कार्यक्रम साजरा होणार आहे. पासबान-ए-अदाब यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम सादर होणार आहे.
 
३१ जुलै रोजी पंजाबी भाषेतील गृहनीती, ओरिया भाषेतील आभंगन, तमिळ भाषेतील आत्मसंगीत, मराठी भाषेतील सद्गती, आसामी भाषेतील नादान दोस्त, बोडो भाषेतील राष्ट्र के सेवक, हिन्दी भाषेतील बडे घर की बेटी १ ऑगस्ट रोजी मैथिली भाषेतील दुर्गा का मंदिर, कन्नड भाषेतील यही मेरा वतन है, तेलुगू भाषेतील प्रेरणा, संस्कृत भाषेतील पूस की रात, संथाली भाषेतील सवा सेर गेहू, मल्याळम भाषेतील प्रतिशोध, मणीपुरी भाषेतील पगला हाती, बंगाली भाषेतील भूत, २ ऑगस्ट रोजी नेपाळी भाषेतील अनुभव, सिंधी भाषेतील मुक्तीधान, कश्मिरी भाषेतील मुफ्त का यश, कोकणी भाषेतील जादू, उर्दू भाषेतील गैरत की कतार, डोगरी भाषेतील खूदी, गुजराती भाषेतील ज्वालामुखी ही नाटके सादर होणार आहेत.